लांजा : गवाणे गावचे पोलीस पाटील रविंद्र कोटकर यांना राज्यस्तरीय राष्ट्रसंत गाडगेबाबा पुरस्कार

लांजा : तालुक्यातील गवाणे गावचे पोलीस पाटील रविंद्र कोटकर यांना राज्यस्तरीय राष्ट्रसंत गाडगेबाबा पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

ग्राम विकास परिषद व पहाट फाउंडेशन छत्रपती संभाजी नगर यांच्या वतीने आयोजित “राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती” सोहळा नुकताच शेगाव येथे पार पडला. पोलीस पाटील म्हणून गवाणे गावात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखत असताना विविध सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करीत अनेक तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबीर, शैक्षणिक दत्तक योजना, विधवा प्रथा बंद करणे व त्यांना सन्मानपूर्वक समाजामध्ये मानसन्मान मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला.

हा पुरस्कार ग्रामविकास परिषद व पहाट फाउंडेशन चे पदाधिकारी भाऊ भजने, मेसेज इंडिया विजेत्या श्वेता परदेशी, प्रसिद्ध साहित्य व्याख्याते प्रा. डॉ. श्री. संजय गायकवाड, भास्कर पेरे पाटील आदर्श सरपंच पाटोदा, पहाट फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल भिलंगे आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. या पुरस्काराबद्दल रवींद्र कोटकर यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 04/Mar/2025