रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : शिक्षण क्षेत्रात मानाचा समजला जाणारा जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षी कनिष्ठ व वरिष्ठ अशा एकूण १८ शाळांना पुरस्कार देण्यात आले आहेत. उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांना दरवर्षी जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी कनिष्ठ विभागात एकूण २२ शाळांचे प्रस्ताव आले होते. यापैकी ९ शाळांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये मंडणगड-बाणकोट किल्ला उर्दू, दापोली – शिवाजीनगर भाँजाळी, खेड आंबवली, चिपळूण – कुशिवडे, शिगवणवाडी नंबर २, गुहागर पाचेरी सडा नं. ३, संगमेश्वर- माभळे घडशीवाडी, रत्नागिरी – शिवार आंबेरे नंबर २, लांजा – चाफेट नेमण, राजापूर-मोसम नंबर २ या शाळांना पुरस्कार प्राप्त झाला.

वरिष्ठ गटात २३ शाळांचे प्रस्ताव आले होते. यातून ९ शाळांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मंडणगड-पाचरळ, दापोली-शिरसोली नंबर १, खेड – भोस्ते नंबर १, चिपळूण मांडकी खुर्द, गुहागर-बेलदर घरटवाडी नंबर १, संगमेश्वर-हातीव नंवर १. रत्नागिरी – भोके आंबेकरवाडी, लांजा – कुवे नंबर २, राजापूर- कशेळी नंबर ५ या शाळांना पुरस्कार प्राप्त झाला. पत्रकार परिषदेला शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते, विस्तार अधिकारी संदेश कडव आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:50 AM 05/Mar/2025