अपघातप्रकरणी दुचाकी चालकाला तिघांकडून मारहाणीसह धमकी

रत्नागिरी : अपघात केल्याप्रकरणी दुचाकी चालकाला तीन जणांनी मिळून शिविगाळ व हातांच्या ठोशांनी मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवार २ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. सुमारास परटवणेनाका येथे घडली. हर्षद धुळप, सुमित धुळप, सुयोग धुळप अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात यश मंगेश शिवलकर (वय २०, रा. सड्ये शिवलकरवाडी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, रविवारी सायंकाळी ६ वा. सुमारास ते अॅक्टीव्हा दुचाकी घेऊन परटवणे नाका येथून जात होते. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या मिनीबसच्या समोरुन एक लहान मुलगी रस्ता ओलांडत असताना फिर्यादी यशच्या दुचाकीची धडक तिला लागून हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर यश पुढे जाउन थांबला असता अचानकपणे तीन संशयितांनी तिथे येऊन संगनमाने यशला हातांच्या ठोशांनी मारहाण केली. त्या नंतर शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 05/Mar/2025