हातखंबा येथे ढाब्यावर काम करणाऱ्या सफाई कामगाराचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील एका ढाब्यावर काम करणाऱ्या सफाई कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शंकर बारक्या झोरे (वय ४०, मूळ रा. प्रचितीगड संगमेश्वर, सध्या रा. हातखंबा ईश्वर ढाबा, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

शंकर झोरे हा हातखंबा येथील ईश्वर ढाबा येथे गेल्या २० वर्षांपासून सफाई कामगार म्हणून नोकरीला होता. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. सोमवार ३ मार्च खबर देणार यांना मयत शंकर झोरेने आपली तब्बेत बरी नसल्याने आपण रुमवर आराम करण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी शंकर हा ढाब्यावर दुपारच्या जेवणासाठी न आल्याने खबर देणार हे ढाब्या शेजारीच असलेल्या त्याच्या रुमवर गेले आणि त्यांनी शंकरला आवाज दिला. परंतू त्याचा कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे खबर देणार यांनी शंकरला प्रथम निवळी येथील खासगी डॉक्टरांकडे नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी शंकरला तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 05/Mar/2025