लांजा : लोकमान्य वाचनालय लांजे यांच्यावतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त खुल्या गटामध्ये जिल्हास्तरीय कथा लेखन स्पर्धा व महाविद्यालय पोस्टकार्ड लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत प्रवीण कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
लांजा येथील लोकमान्य वाचनालय लांजे यांच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त व मराठी राजभाषा दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हास्तरीय कथा लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. कथा लेखन स्पर्धेत खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, राजापूर, रत्नागिरी व लांजा येथून स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये प्रवीण कांबळे (अंधारवाटा), यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, द्वितीय क्रमांक अमित पंडित (एका उद्ध्वस्त ग्रहाची गोष्ट), तृतीय क्रमांक मनोज भागवत (घळण), उत्तेजनार्थ तनुजा प्रभूदेसाई (अपरिचित) व विशाखा चितळे (देवमासा) या स्पर्धकांनी यश प्राप्त केले.
यासह लांजा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याल मर्यादितघेण्यात आलेल्या पोस्टकार्ड लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक साक्षी कुरूप, द्वितीय क्रमांक मानसी खानविलकर, तृतीय क्रमांक केतकी दीक्षित या स्पर्धकांनी यश मिळवले. या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा शनिवार दि. १ मार्च रोजी लांजा शहरातील जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा येथील प्रा. मधु दंडवते सभागृह आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मुंबई आकाशवाणीच्या वृत्तनिवेदिका, लेखिका, कथा कथनकार श्रद्धा वझे यांच्याहस्ते करण्यात आला.
बक्षीस वितरणप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. अभिजित जेधे, सल्लागार विजय बेर्डे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे, कार्यवाह उमेश केसरकर, संचालक विजय नारकर, संचालिका विजयालक्ष्मी देवगोजी, ललिता भिंगे, खावडी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक डी. डी. देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उमेश केसरकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाचनालयाच्या सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 05/Mar/2025














