गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ संस्थगित

रत्नागिरी : गोगटे – जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) मधून मार्च २०२५ मध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाचे आयोजन शनिवार दि. ८ मार्च सकाळी ११.०० वाजता राधाबाई शेट्ये सभागृहात करण्यात आले होते. परंतु मुंबई विद्यापीठाच्या सूचनेनुसार हा पदवीदान समारंभ स्थगित करण्यात आला आहे.

पदवीदान समारंभाची नवीन तारीख निश्चित झाल्यावर जाहीर करण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्यांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 05/Mar/2025

Lok. Tilak hospi.