खेड : सुकीवलीत तिहेरी अपघात

खेड : खेड आंबवली मार्गावर सुकीवली गावाजवळ एसटी, आणि दोन मोटारी अशा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला. यामुळे काही प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला.

या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी नाही, खेडहून नांदिवली’ला निघालेल्या एसटी बस आणि समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅन आणि मोटार या तीन गाड्या एकमेकांना घासून हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीनही वाहनांचे मोठे नुकसान झालेले आहे. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद खेड पोलिस ठाण्यात झाली नव्हती. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 05/Mar/2025