देवरूख : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सायन्स एक्स्पो’

देवरूख : नजीकच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून ‘सायन्स एक्स्पो २०२५’ हा अनोखा उपक्रम उत्साहात झाला. महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या संघटनेने हा उपक्रम घेतला.

यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख, पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल, देवरुख, लोकविद्यालय, तुळसणी, दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी, श्रीमती अरुंधती पाध्ये इंग्रजी माध्यम विद्यालय यांनी सहभाग घेतला. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक कार्यक्रम ठेवण्यात आले होते. संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. महेश भागवत, विभागप्रमुख प्रा. शुभांगी कांबळे, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ गौरव कदम तसेच प्राध्यापक, स्पर्धक उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत नकाशा भरणे स्पर्धेत पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलची अवंतिका पवार हिने प्रथम, यशश्री गमरे हिने द्वितीय तर कार्तिकी विंचू हिने तृतीय क्रमांक मिळविला. चित्रकला स्पर्धेत दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबीचा ओंकार रामाणे याने प्रथम क्रमांक, त्रिवेश बचाव याने तृतीय, सार्थक रामाणे याने उत्तेजनार्थ व न्यू इंग्लिश स्कूलच्या कस्तुरी गीते हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. विज्ञान प्रकल्प प्रदर्शनामध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या चैताली सुर्वे आणि श्रेया मेस्त्री यांनी प्रथम, दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबीच्या आदित्य आंबवकर व राज दोरकडे यांनी द्वितीय आणि श्रीमती अरुंधती पाध्ये इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या दर्श धनावडे याने तृतीय क्रमांक मिळविला.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलचा सोहम जोशी आणि अर्णव पाटील यांनी प्रथम क्रमांक, पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या मृणाल मोहिरे व आर्या लाहिया यांनी द्वितीय तसेच अद्वैत नारकर व रुद्राक्ष चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके व पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. नूतन मुळे, विद्यार्थी प्रमुख सिद्धेश गुरव तसेच विभागीय प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 05/Mar/2025