खेड : तालुक्यातील आंबवली- देऊळवाडी येथील श्री झोलाई क्रीडा मंडळाच्या वतीने व तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने १४ मार्च रोजी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विजेत्यास शिवसेना संपर्कप्रमुख महेश मोरे यांच्या सौजन्याने ७००१ रुपये, उपविजेत्यास तालुका संघटक महेंद्र भोसले यांच्यामार्फत ५००१, तृतीय क्रमांकास उपविभागप्रमुख संतोष यादव यांच्या सौजन्याने ३००१, चतुर्थ क्रमांकास अध्यक्ष अनंत पवार यांच्यामार्फत २००१ रुपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट चढाई, पकड यांनाही मनोहर यादव तर प्रशांत आखाडे यांच्यातर्फे चतुर्थ क्रमांकास चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दीपक यादव, विकास यादव यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 05/Mar/2025














