कुणबी समाजाचे नेते नंदकुमार मोहिते यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

रत्नागिरी : कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते, एक ज्येष्ठ समाजसेवक, एक आगळ वेगळं व्यक्तिमत्व, शिक्षण महर्षी, कुळ कायद्याचे अभ्यासक, शामरावजी पेजे महाविद्यालयाचे संस्थापक व अध्यक्ष, ओबीसी समाजाचे अभ्यासक, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि बळीराज सेनेचे सरचिटणीस नंदकुमार मोहिते यांचे आज सकाळी ह्रदय विकार झटक्याने दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या निधनाची बातमी कळताच क्षणभर धक्काच लागला. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचं नुकसान तर झालेलेच आहे परंतु कुणबी समाजाचे सुद्धा कधीही भरून न येणारे नुकसान झालेले आहे.

उद्या ७ मार्च रोजी सकाळी अंत्यदर्शनासाठी १०वाजता लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालय शिवार आंबेर येथे ठेवण्यात येणार आहे आणि १०:३० ला अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 06-03-2025