दापोली : बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांचे असून, त्यावर पुजाऱ्यांनी १९४९ च्या मंदिर कायद्यानुसार कब्जा केला आहे. या देशातील बौद्धांची विरासत कायम टिकून ठेवण्यासाठी याबाबत चाललेल्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी बौद्धजन सेवासंघ मुंबई व तालुका दापोली मंडणगड, भारतीय बौद्ध महासभा दापोली व बौद्धजन पंचायत समिती यांच्या नेतृत्वाखाली दापोलीच्या तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांचे असून, त्यावर पुजाऱ्याने १९४९च्या मंदिर कायद्यानुसार कब्जा केलेला आहे. या देशातील बौद्धविचार नष्ट करण्याच्या या षड्यंत्राविरोधात अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. सध्या या महाविहार परिसरात बौद्ध भिक्क्षु संघाने उपोषणासारखा मार्ग स्वीकारून नव्याने संघर्ष सुरू केला आहे. त्यांच्या या संघर्षाला जगभरातून पाठिंबा दर्शवला जात असून, अमेरिकेसह सुमारे ४० देशांतील बौद्ध भिक्क्षु या संघर्षात सामील झाले आहेत. दापोलीमध्येही या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी या उपोषणात शरद जाधव, सुरेश मोरे, अशोक जाधव, प्रीतम रूके, विजय पवार, अनिल जाधव, अनंत मर्चेंडे, विजय जाधव, बंटी मोरे, रवींद्र मोहिते, अर्चना येलवे, शर्मिला पवार, शीला लोंढे, अनिल घाडगे, अशोक जाधव, मधुकर मर्चेंडे, सुनील जाधव, जयवंत जाधव, विलास पवार, दिनेश रूके, श्रीकांत पवार यांच्यासह अन्य बौद्धबांधव सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 06/Mar/2025












