देवरुखात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम

देवरूख : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य (आरबीएसके २.०) कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यामध्ये ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी तसेच त्यांना संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. या अंतर्गत देवरूख येथेही राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

देवरुख येथील कार्यक्रमांसाठी मुख्याधिकारी चेतन विसपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद मोरे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप माने, डॉ. शिवाजी साळुंखे, डॉ. पवार, डॉ. विशाल शिर्के, डॉ. पावरी, डॉ. खातू, डॉ. बैरागदार व ग्रामीण रुग्णालय देवरुख येथील कर्मचारी व आरबीएसके पथकातील औषधनिर्माता, परिचारिका तसेच आयसीडीएस विभाग प्रमुख वंदना यादव, सामाजिक कार्यकर्ते युयुत्स् आर्ते आदी उपस्थित होते.

उ‌द्घाटन समारंभानिमित्त बालकांच्या आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. विशाल शिर्के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व मुलांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. निदान झालेल्या मुलांना जिल्हा पातळीवर लवकर हस्तक्षेप सेवा आणि फॉलो अप काळजी प्रदान केली जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 06/Mar/2025

Tata safari