देवरुख : इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये दोन दिवसीय विशेष कार्यशाळा

देवरुख : नजीकच्या साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पतींमधील जैवसक्रिय घटकांचे विलगीकरण व त्याचे निष्कर्षण या विषयावर कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उद्घाटन संस्था अध्यक्ष रवींद्र माने आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यशाळेचा उद्देश फार्माकोग्नोसी आणि फाइटोकेमिस्ट्री या क्षेत्रातील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना सैद्धांतिक व प्रयोगशील ज्ञान देणे हा होता. कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील प्रसिद्ध फार्माकोग्नोसी तज्ज्ञ प्रा. डॉ. के. एस. लठ्ठा यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण २३ तसेच बंगळुरूमधून १ अशा एकूण २४ जणांनी सहभाग घेतला.

कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच कार्यशाळेचे समन्वयक म्हणून विवेक कुलकर्णी, रोहित राज, तसेच सहसमन्वयक म्हणून डॉ. मेधा खाडे, प्रशांत गुरव, निकुल पटेल आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यशाळेचा समारोप संस्थेच्या कार्याध्यक्ष नेहा माने, प्रद्युम्न माने यांच्या उपस्थितीत झाला. प्रा. प्रशांत गुरव यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 06/Mar/2025