खेड रेल्वे स्थानकात २३ हजारांची चोरी

खेड : कोकण रेल्वे मार्गावरून दि. २ रोजी धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसमधून कणकवली ते खेड असा प्रवास करीत असताना खेड स्थानकात रात्री ९ ते ८ वाजण्याच्या सुमारास एका महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने पळवून नेली. शालीनी भिकाजी नेरकर (६०, रा. नेरुळ, नवी मुंबई) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार रेल्वे गाडी जेव्हा खेड स्थानकात आली तेव्हा त्या झोपेत होत्या.

त्यांची खांद्याला लावायची पर्स त्यांनी डोक्याजवळ ठेवली होती. त्या पर्समध्ये वीस हजार रुपये किमतीचा रुपेरी रंगाचा मोबाईल फोन, तीन हजार रुपये किमतीची नथ, शंभर रुपये किमतीची शोल्डर पर्स असा एकूण २३ हजार १०० रुपयाचा ऐवज होता. अज्ञात चोरट्याने ही पर्स चोरली. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 06/Mar/2025

Shanti2