मंत्री योगेश कदम यांच्यासोबत शिक्षक संघाची विविध विषयांवर चर्चा

दापोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, दापोलीच्या शिष्टमंडळाने, राज्यमंत्री ना. योगेश कदम यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा करीत निवेदन दिले. या वेळी शिक्षणसेवक प्रश्नांसंबंधी चर्चा करण्यात आली. यावेळी संघाने सकाळ सत्रातील शाळांबाबत माहिती देत रायगड जिल्हा परिषदेचे पत्र दाखवून चर्चा केली. १६ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा अधिवेशनासाठी ना. कदम यांना निमंत्रण दिले. शिक्षकांच्या हितासाठी आपण सदैव सोबत असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप जालगावकर, जीवन सुर्वे, गणेश तांविटकर, महेंद्र खांबल, महेश गिम्हवणेकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 06/Mar/2025

Kohinoor furni.1