खेड बसस्थानकातील गटाराचे काम हाती

खेड : बसस्थानकातील सुलभ शौचालयानजीकच्या समोरील भागात साचणाऱ्या पाण्यामुळे सातत्याने खड्डा पडत आहे. याच खड्यातून बसेस मार्गस्थ होत असल्याने खड्याचा विस्तार वाढून सर्वत्र दलदल निर्माण झाली होती. याबाबत एसटी प्रशासनाक केलेल्या तक्रारीची दखल घेत मध्यभागी मुरणारे गटारातील पाणी रोखण्यासाठी सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटाराचे काम हाती घेतले आहे.

एसटी प्रशासनाला भाडेतत्त्वावर बसस्थानकासाठी जागा बसस्थानकालगतच्या सोसायटीतील एक इमारतीच्या मालकाच्या सदनिकेतील सांडपाण्याचा निचरा योग्य तऱ्हेने न झाल्यामुळे हे पाणी गटारातून बसस्थानकाच्या मध्यभागात मुरत होते. हे पाणी बसस्थानकाच्या आवारात घुसून मुरणाऱ्या पाण्यामुळे मध्यभाग खड्डेमय झाला होता. एसटी प्रशासनाकडून मलमपट्टी करण्यात येत होती. मात्र पुन्हा उखडणाऱ्या खड्यामुळे चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे पाणी रोखण्यासाठी गटाराचे नवीन बांधकाम हाती घेण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 06/Mar/2025

Tava mahotsav