रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने पंडित दीनदयाळ उपाध्याय मेळाव्याचे १२ मार्च रोजी सावर्डे येथे आयोजन केले आहे. सह्याद्री शिक्षण संस्था, सह्याद्री तंत्रनिकेतन येथे सकाळी १०:०० वाजता हा मेळावा होणार आहे.
जिल्ह्यातील उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतेच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाइल अद्ययावत करावे. युझर आयडी व पासवर्डच्या सहायाने ऑनलाइन अर्ज करून मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे कळविले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 06/Mar/2025














