देवरूख : शहरातील ग्रामीण रुग्णालयात ८ रोजी महिला आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ही आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
यात रक्तदाब, मधुमेह, हिमग्लोबिन, कॅल्शिअम, नेत्र तपासणी, दंत तपासणी, कर्करोग पूर्व तपासणी, कर्करोग मार्कर तपासणी केली जाणार आहे. तसेच महिलांचे आरोग्य, सकस आहार व बदलती जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 07/Mar/2025














