देवरुख : ध्वनी प्रदूषण नियमनाचे पालन करण्याचे आवाहन

देवरुख : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्यानुसार अंमलबजावणी करण्याबाबत देवरूख शहरात ध्वनी प्रदूषणाचे पालन करण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण नियमनाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण बाबत तक्रार निवारण यंत्रणा व इतर मुद्याबाबत कारवाई करण्याकरिता महेश सकपाळ, लिपिक ध्वनी प्रदूषण विभाग, नगरपंचायत देवरुख यांना नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना याबाबत अधिक माहितीसाठी तसेच ध्वनी प्रदूषणबाबत काही तक्रार असल्यास महेश सकपाळ यांच्याशी देवरुख नगरपंचायत कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन नगर पंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 07/Mar/2025