महाबोधी विहार मुक्तीसाठी भीमसैनिकांचा खेडमध्ये मोर्चा

खेड : बिहारमधील बौद्ध गया येथील महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी गुरुवारी (दि. ६) खेडमध्ये भीमसैनिकांचा विराट मोर्चा काढण्यात आला. खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाच्या सर्व शाखांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघासह आंबेडकर विचारांच्या विविध संघटनांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आली.

खेडमध्ये गुरुवार, दि. ६ रोजी मोर्चात हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते. हातात निळे झेंडे आणि घोषणा देत भीमसैनिक खेडच्या रस्त्यांवरून चालले. ‘महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या’, ‘जय भीम’ अशा घोषणांनी खेड शहर दणाणून गेले. मोर्चा खेडच्या तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी भीमसैनिकांचे निवेदन स्वीकारले. निवेदनात महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांनी सांगितले की, भीमसैनिकांचे निवेदन शासनाकडे पाठवले जाईल. शासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल.

हा मोर्चा शांततेत पार पडला. मोर्चात सहभागी झालेल्या भीमसैनिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने घोषणा दिल्या. पोलिसांच्या सहकार्यासाठी समता सैनिक दलाचे स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.

महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे
सभेला संबोधित करताना खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाच्या अध्यक्षांनी सांगितले की, महाबोधी विहार हे बौद्धांचे पवित्र स्थळ आहे. या विहारावर बौद्धांचा हक्क आहे. सरकारने हा विहार लवकरात लवकर बौद्धांच्या ताब्यात द्यावा. यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

Happy journey english

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 07/Mar/2025