रत्नागिरी : जिल्ह्यातील काही आशांच्या कुटुंबातील सदस्यांनी बांधकामविषयक कार्ड काढलेले असतानाही नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र संबंधितांना मिळालेले नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांची नोंदणी करता आलेली नाही. काहींना ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्यात ग्रामसेवक तयार नाहीत. त्या महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी ६ मार्चला जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. तेव्हा संबंधित महिलांना ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील ज्या कंत्राटदारांकडून नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संपर्क सुरू आहे. तेथील कामगार संघटनेचे नेते दीपक म्हात्रे ६ ला रत्नागिरीत येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त आशा व गटप्रवर्तक महिलांनी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेत एकत्रित यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी सुमन पुजारी, शंकर पुजारी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 07/Mar/2025














