लांजा : वेरळ घाटीत ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात; चालक गंभीर

लांजा : वेरळ (ता. लांजा) उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकेश राम सोनकर (वय २४, रा. उत्तरप्रदेश) असे गंभीर जखमी चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ६) दुपारी एकच्या सुमारास वेरळघाटी उतारात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश सोनकर हा ट्रकमध्ये पेपरचा कच्चा माल घेऊन गुजरातहून गोवा राज्याकडे जात होता. वेरळ घाटीत आला असता ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक उलटला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास लांजा पोलिस अमंलदार करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 07-03-2025