राजापूर : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत तालुक्यातील पाचल तसेच खारेपाटण येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानातून सुमारे ३५ ते ४० टन कचरा गोळा करण्यात येऊन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या अभियानादरम्यान पाचल विभागात आठवडा बाजार परिसर, बाजारपेठ, शासकीय गोडाऊन परिसर, जवळेथर रोड रस्ता ते सरस्वती विद्यामंदिर त्याचप्रमाणे खारेपाटण विभागात ग्रामपंचायत परिसर, पोलीस चेक पोस्ट ते रामेश्वर नगर हायवे रोड, आठवडा बाजार रस्ता, चव्हाटा परिसर, स्मशानभूमी परिसर, आठवडा बाजार रोड ते एस.टी. डेपो परिसरातील रस्त्यांची आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली.
या वेळी मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला. या स्वच्छता अभियानामुळे परिसराला नवी ओळख मिळाली. पाचल येथील स्वच्छता अभियानाची सुरुवात सरपंच बाबालाल फरास व उपसरपंच आत्माराम सुतार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी श्री सदस्यांनी पाचलमधील सुमारे २.५०० कि.मी. रस्त्याची स्वच्छता केली. खारेपाटण येथील अभियानात राजापूर, नाणार, सागवे, अणसुरे बाकाळे, केळवली, दोनिवडे बैठकीतील ५४० श्री सदस्य तर पाचल विभाग मधील स्वच्छता अभियानात भालावली, गावडे आंबेरे, कोदवली, रिंगणे, लांजा बैठकीतील ३०५ श्री सदस्य सहभागी झाले होते.
श्री सदस्यांनी मोठ्या प्रमाणात राबवलेल्या या स्वच्छता उपक्रमाचे परिसरातून व समाजातून कौतुक करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 08/Mar/2025













