साखरपा : देवळे येथे महिलांनी एकत्र येऊन सूर्यफुलाचा मळा फुलवला आहे. उन्हाळ्यात शेती करता येत नाही, या मानसिकतेला छेद देत महिलांनी सूर्यफुलाचे हे पीक घेतले आहे.
कोकणात उन्हाळी शेती हा प्रकार अत्यंत दुर्मिळ समजला जातो. पाणीटंचाईमुळे उन्हाळी शेती केली जात नाही. घरगुती भाजीपाला आणि कलिंगड लागवड सोडल्यास अन्य उत्पन्नाचा विचार शेतकरी करत नाही; पण या सगळ्याला छेद देत देवळे येथील महिलांनी सूर्यफूल शेती केली आहे. गावातील बाजारपेठेनजीक त्यांनी फुलवलेला सूर्यफूलांचा मळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बाजारपेठेजवळ प्रसाद अपंडकर यांच्या जागेत त्यांनी ही शेती केली आहे. रेश्मा परशेट्ये, अमृता शिंदे, विनया अपंडकर, स्वरा आंब्रे, शुभांगी सक्रे, हर्षदा काळोखे, प्रगती पातेरे, कोरगावकर, गुरव या महिला एकत्र येत त्यांनी हा सामूहिक शेतीचा प्रयत्न यशस्वी केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 08/Mar/2025














