दापोली : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) कार्यरत महिलांनी दापोली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ग्रामविकास व पंचायतराज विभागामधील शासनाचा एक नियमित भाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्या आणि त्या अंतर्गत असणाऱ्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या समानकक्ष पदांवर शासनाच्या कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी महिलांनी केली.
उमेद विभागाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, अशा घोषणा देत दापोलीतील महिलांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. उमेद संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या विभागाच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यांची पूर्ती न करता शासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे मागण्यांची पूर्ती होण्यासाठी तालुक्यामध्ये काल रॅली काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 05/Oct/2024














