Nitesh Rane : शिवरायांच्या सेवेत चार-पाच मुस्लिम असतील परंतु शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता-नितेश राणे

जुन्नर : Nitesh Rane : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवरायांची ओळख वारंवार सांगितली पाहिजे, शिवरायांना सेक्युलर राजा म्हणून ओळख देण्याचे ब्रीगेडी लोकांचे प्रयत्न सुरू आहेत, शिवभक्तांनी ते प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत असे प्रतिपादन राज्याचे मत्स्योद्योग व बंदरविकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी किल्ले शिवनेरीवर केले शिवनेरी स्मारक समिती पुणे व शिवजयंती उत्सव समिती जुन्नर यांच्या वतीने तिथीनुसार साजरी करण्यात येनाऱ्या शिवजयंती उत्सवप्रसंगी ते बोलत होते.

ब्रिटिशांनी हिंदू सेनापती म्हणून छत्रपती शिवरायांचा उल्लेख केला आहे. आदिलशहाच्या फर्मानामध्ये शिवरायांच्या काळात इस्लाम धर्माची वाढ खुंटली असे उल्लेख आहेत. छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्य संस्थापक होते याचे हे पुरावे आहेत. शिवरायांच्या सेवेत चार-पाच मुस्लिम असतील परंतु शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता असा दावा यावेळी राणे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, शिवरायांची भूमी प्रेरणास्त्रोत आहे. हिंदू समाजाला लढण्याची प्रेरणा शिवरायांनी दिली. शिवरायांचा चुकीचा इतिहास पुढील पुढे येऊ नये यासाठी शिवभक्तांनी काळजी घ्यावी . शासनाचा कोनता मंत्री म्हणून नाही ,आमदार म्हणून नाही, तर शिवभक्त म्हणून किल्ले शिवनेरीवर आलो आहे. शिवनेरीच्या पायथ्याशी पायथ्याशी जीहाद्यानी अतिक्रमण केले आहे असे कानावर आले आहे, ज्यांच्या विरोधात शिवराय लढले त्यांना किल्ल्याच्या अवतीभोवती श्वास घेऊ देणार नाही. औरंगजेबाच्या कबरी संदर्भात बोलताना मंत्री म्हणून मर्यादा आहेत परंतु आज मंत्री आहे ,उद्या नसेल परंतु मरेपर्यंत हिंदू राहणार आहे .

आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी बोलताना तिथीप्रमाणे देखील शिवजयंती साजरी व्हावी अशी शिवभक्तांची भावना आहे. १९ फेब्रुवारीच्या शिवजयंतीला शासनाचा निधी मिळतो त्याचप्रमाणे तिथीप्रमाणे साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंतीसाठी देखील निधी मिळावा अशी मागणी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:10 17-03-2025