रामपूर : होळी सणासाठी रामपूरची जागृत ग्रामदेवता केदारनाथ मंदिरातून १३ मार्चला रात्री ११ वा. वाजतगाजत, ताशांच्या गजरात केदार मंदिर ते सहाणेपर्यंत भाविकांनी पालखी आणली. तत्पूर्वी होळीचा माड वाजत, गाजत आणला. होमाभोवती केदारनाथाची पालखी ५ वेळा फिरवली. पहाटे होम पेटवला. श्रीफळ होमात टाकून गा-हाणे घालण्यात आले.
प्रतिवर्षीप्रमाणे धुलिवंदनाच्या दिवशी सहाणेवर केदारनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष विलासराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. उपाध्यक्ष मनोज चव्हाण, कार्याध्यक्ष वामनराव चव्हाण, सेक्रेटरी धनंजय रावराणे, खजिनदार गणेश चव्हाण, सदस्य सत्यवान म्हामुनकर, सल्लागार मंडळ मुंबई केदारनाथ मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. उपाध्यक्ष मनोज चव्हाण यांनी आभार मानले. रामपूर गावातील तळ्याची वाडी, कातकरवाडी, बैकरवाडी, तांबी मराठावाडी, खालची रोहिदासवाडी, गावणंगवाडी, अलाटी वाडी, कुंभारवाडी, गिरीवाडी, आवटेवाडी, वरची रोहिदास वाडी, गुढेफाटा काळकाई नगर येथील ग्रामस्थ सहाणेवर उपस्थित होते. केदारनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष विलासराव चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. श्री केदारनाथ पालखीची पूजा, आरध लावणे.
केदारनाथाची पालखी भक्तांच्या भेटीला घरोघर, वाड्या-वाड्यांवर निघाली आहे. यावर्षी २०२५ चे मानकरी सूरज राजेंद्र चव्हाण आहेत. १९ रोजी रंगपंचमीमुळे पालखी सहाणेवर विराजमान होईल. २० रोजी पालखी तांबी मराठवाडी येथे, २१ व २२ रोजी कातकरवाडी, २३ रोजी रोहिदासवाडी, २४ रोजी गावणंगवाडी, २५ रोजी कुंभारवाडी, २६ अलाटीवाडी, २७आवटेवाडी, २८ रोजी गिरीवाडी, २९ रोजी वरची रोहिदासवाडी, ३० रोजी पालखी सहाणेवर वस्ती करेल. ३१ मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, तळ्याची वाडी. १ एप्रिल काळकाई नगर गुढे फाटा, गुरव वस्ती, २ गावकर मानकरी यांच्याकडे वस्ती, ३ रोजी सहाणेवर सत्यनारायण महापूजा, ४ रोजी गोंधळ, ५ रोजी सायंकाळी सहाणेवरून पालखी केदारनाथ मंदिराकडे प्रस्थान व शिंपणे कार्यक्रम होईल. २५ एप्रिल रोजी रामपूर केदारनाथाची चैतावली यात्रा होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 19/Mar/2025














