खेडमध्ये ८० भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण

खेड : खेड नगरपालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. मोक्याच्या ठिकाणी येणाऱ्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडीमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर प्रशासनाने निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली असून, पुणे येथील पेटस् फोर्स संस्थेला ठेका देण्यात आला आहे.

गेल्या ६ दिवसांत ८० भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या मोहिमेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर प्रशासनाने २ महिन्यापूर्वी निर्बिजीकरणाची मोहीम राबवण्याचे संकेत दिले होते; मात्र प्रत्यक्षात कार्यवाही न झाल्याने मोकाट कुत्र्यांचा नागरिकांनी धसका घेतला होता. नगर प्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर अखेर २० मार्चपासून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यास सुरवात झाली.

पाचशेचे उद्दिष्ट
शहरासह परिसरातून येणाऱ्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. यामुळे हाती घेतलेली निर्बीजीकरणाची मोहीम सुरूच राहणार आहे. ५०० भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे खेड मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सांगितले.

Mahrashi karve ANM

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 28/Mar/2025