दापोली : लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली

दापोली : येथे नुकत्याच झालेल्या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित १४ प्रकरणे तर वादपूर्व ११६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

प्रलंबित १४ प्रकरणातून १० लाख ६३ हजार ३७० रुपये तर वादपूर्व ११६ प्रकरणांतून १५ लाख ५० हजार ३२ रुपयांची वसुली करण्यात आली. लोकअदालतमुळे पक्षकारांचा तसेच सरकारी यंत्रणांचाही वेळ वाचत असल्याने लोकांचा त्याला प्रतिसाद वाढत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 02/Apr/2025