राजापूर : अर्वाचीन गगनगिरी महाराज मठाचा जीर्णोद्धार सुरू

राजापूर : अर्वाचीन प्राचीन अशा कोकण प्रांतातील राजापूर तालुक्यातील मौजे आंगले येथील स्वामी गगनगिरी महाराजांचा जुना मठ आहे. या वास्तूच्या जीर्णोद्धाराचे काम जोरात सुरू आहे.

या नियोजित नवीन मठांमध्ये स्वामी गगनगिरी महाराजांची कृष्णशिळा दगडातून मूर्ती घडवण्याचे संकल्प असून त्याचा शिलापूजन कार्यक्रम नुकताच श्रीक्षेत्र ओणी आश्रमाचे मठाधिपती नाथ योगी उल्हासगिरी यांच्या हस्ते कुडाळ जवळील झारप येथे मान्यवरांसह आंगले ग्रामवासीयांच्या उपस्थितीत करण्यात आला.

याप्रसंगी मूर्ती घडवण्याऱ्या कारागिराला उल्हासगिरी यांच्या हस्ते श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. दगडी मूर्ती लवकरात लवकर करून देण्याचे मूर्तिकाराने आश्वासन दिले आहे.

नवीन मंदिर व संकल्पित वास्तूचे उ‌द्घाटन १३ व १४ मे रोजी करण्यात येणार आहे. या नूतन आश्रमांचे सेवा कार्यासाठी व धार्मिक सोहळा यशस्वी होण्यासाठी आंगले ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन आंगले आश्रमचे अध्यक्ष व सरपंच श्रीधर सौंदाळकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:14 PM 02/Apr/2025