खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील लवेल येथील राजस्थानी ढाब्याच्या बाजूला असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या मोकळ्या जागेत ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली. संदीप शंकर जाधव (४५, रा. दरे-सातारा) असे या घटनेतील मृत चालकाचे नाव आहे.
यातील फिर्यादी व मृत ट्रकचालक दोघेही औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीतील माल कर्नाटक राज्यात वाहतूक करतात. दि. २ एप्रिल रोजी दोघेही युनिलिव्हर कंपनीत माल भरण्यासाठी आले होते. ट्रक भरण्यासाठी नंबर नसल्याने ते लोटे येथे ट्रकसह मुक्कामी राहिले. दि. ३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास जेवण आटोपून ट्रकचालक ट्रक केबिनमध्ये झोपण्यासाठी गेला होता.
दुसऱ्या दिवशी त्याने काहीही प्रतिसाद न दिल्याने एका रुग्णवाहिकेतून परशुराम रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता मृत घोषित केले. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 07/Apr/2025














