रत्नागिरी : शहरानजीकच चंपक मैदान येथे आंबे काढत असताना तेथील विद्युत तारेला घळाचा स्पर्श लागून शॉक लागलेल्या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ८.४५ वा. सुमारास घडली.
महेश राजू इलम (३०, रा. पोसरे, खेड, रत्नागिरी) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. महेश इलम हा अनिल नार्वेकर यांच्याकडे कामाला होता. शनिवारी सकाळी तो चंपक मैदान येथील आंब्याच्या झाडावरील आंबे काढत होता. त्यावेळी त्याच्या हातातील घळाचा स्पर्श झाडाच्या बाजूनेच जाणाऱ्या विद्युत तारेला झाला.
त्यामुळे महेशला शॉक लागून तो थरथरू लागला. ही बाब त्याच्या सहकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी महेशला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेशला तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 07/Apr/2025












