रत्नागिरी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय कला उत्सवात अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलाप्रकारात सहभाग घेऊन यश संपादन केले.
दृश्यकला या कलाप्रकारात ऋषभ कोतवडेकरने द्वितीय, तीर्था किनरेने तृतीय, नाट्य कलाप्रकारामध्ये आर्या भोळेला उत्तेजनार्थ, गायन प्रकारात सृष्टी तांबेने तृतीय क्रमांक मिळवला. ही स्पर्धा पटवर्धन हायस्कूल येथे घेण्यात आली. या स्पर्धेकरिता डॉ. स्वराली शिंदे, सुप्रिया टोळ्ये, भालचंद्र रानडे, चारूदत्त पडधार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 08/Oct/2024