गुहागर : पाटपन्हाळे महाविद्यालयात मॉक इंटरव्ह्यू स्पर्धा

गुहागर : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स वरिष्ठ महाविद्यालय व लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्या माध्यमातून मॉक इंटरव्ह्यू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ महाविद्यालयाच्या ११० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.

स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ. सुभाष खोत यांच्याकडून रोख रक्कम व विनोद पटेल यांच्याकडून शिल्ड देण्यात आली आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाकरिता रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येते. लायन्स क्लब गुहागर सिटीच्या वतीने चार्टर प्रेसिडेंट शामकांत खातू, संतोष वरंडे, विनोद पटेल यांनी मेंटॉर म्हणून व सत्यवान घाडे, यशवंत बर्वे, चव्हाण आदींनी विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली. मार्केटिंग, आयुर्विमा एलआयसी, बँकिंग या प्रकारे तीन पॅनेल करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:25 PM 08/Oct/2024

Shanti2