तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाईदेवीच्या पाषाण मूर्तीचे पंढरपूरहुन चिपळूण येथे आगमन

गुहागर : तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या पाषाण मूर्तीचे सोमवारी दुपारी 1 वाजता पंढरपूरहुन चिपळूण येथे आगमन झाले. दुपारी 3 वाजता देवघर पेट्रोल पंप येथून वाजत गाजत भव्य रॅली ग्रामदेवतेचा जयघोष करत निघाली.

पंढरपूर येथून तयार करून आणलेल्या पाषाण मूर्ती देवघर पेट्रोल पंप येथुन दुपारी 3 वाजता गावातील दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी वाहने देवघर पेट्रोल पंप येथून भव्य रॅलीने ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा जयघोष करत ही रॅली तळवली हायस्कूल येथे सीमेपर्यंत आणण्यात आली. यानंतर तळवली गावच्या सीमेवरून ढोल-ताशांच्या आणि सनईच्या सुरात ही मिरवणूक गावच्या सहाणेपर्यंत आणण्यात आली.

तळवली गावची ग्रामदेवता सुकाई देवी ही जागृत असून भक्तांच्या हाकेला धावून धावणारी अशी तिची ख्याती आहे. अनेक वर्षांच्या कालखंडानंतर हा पाषाण मूर्ती जीर्णोद्धार सोहळा पार पडत असल्याने मोठ्या उत्साहाचे वातावरण गावात निर्माण झाले आहे. आपल्या ग्रामदेवतेच्या आगमनासाठी येथील भक्तगण आतुरला होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 08/Oct/2024

Infigo Eyecare