पावस : तालुक्यातील गावडेआंबेरे येथील सातपऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद पडते. त्यामुळे मोठ्या पुलाची मागणी होत होती.
यासाठी ८ कोटीचा निधी मंजूर झाल्याने पुलाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 17/Apr/2025














