सावर्डे : वालावलकर रुग्णालयाच्या कान, नाक, घसा विभागाच्या वतीने दुर्बिणीद्वारे सायनस सर्जरी कॅडेव्हेरिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वर्कशॉपमध्ये १८ कान, नाक, घसा, सर्जनना सायनस वरील आजारांच्या शस्त्रकियेचे प्रशिक्षण तज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी १० कॅडॅव्हर्ड्स वापरण्यात आली. कान, नाक, घसा सर्जननी या कॅडेव्हेरिक बॉडीज वर सर्जरी करून सायनस वरील ऑपरेशनमध्ये निपुणता मिळवली.
हे प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सांगली, मिरज, नांदेड, रत्नागिरी येथील सर्जन सहभागी झाले होते. प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई येथील डॉ. राजेश यादव, डॉ. शशिकांत मशाल, डॉ. तृप्ती गडकरी व पुण्याचे डॉ. प्रसून मिश्रा आणि डॉ. परेश चव्हाण तर सांगली येथून डॉ. सचिन निलाखे असे दिग्गज सर्जन्स प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. या शिबिरासाठी लागणारी अद्यावत मशीनरी जसे की एंडोस्कोपिक सिस्टिम, कॅमेरा, सर्व दुर्बिणी, डेब्रीडर, ड्रिल या सर्व गोष्टी वालावलकर रुग्णालयात उपलब्ध असल्याने प्रशिक्षण सुलभ झाले. या विच्छेदन कार्यशाळेसाठी जशी व्यवस्था शस्त्रक्रिया गृहात केली जाते. अगदी तशीच सर्व सोय टेबल्स, कॅमेरा, लाईट्स, इत्यादी यंत्रणा पुरवण्यात आली होती.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजेच सॉफ्ट एम्बलबेड कॅडॅव्हर शजे एका विशिष्ठ द्रावण वापरल्यामुळे मऊ राहते आणि ज्यामुळे सर्जन्सला शिकायला सोपे जात होते. अशा प्रकारचे कॅडॅव्हर्ट्स महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध नाहीत. असे कॅडॅव्हर्स उपलब्ध करून देण्याचे काम डॉ. प्रशांत मूल्या, प्रोफेसर शरीरशास्त्र विभाग भ. क. ल. वालावलकर मेडिकल कॉलेज यांनी केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी वालावलकर रुग्णालयातील कान नाक घसा तज्ञ डॉ. राजीव केणी आणि डॉ. प्रतीक शहाणे यांनी विशेष मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 17/Apr/2025














