राजापूर : शहरानजीकच्या हर्डी येथील ग्रामस्थ व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंते राजाराम मासये यांच्या हर्डी सडा येथील काजू बागेला वणवा लागल्याने ७० टक्के काजू कलमे जळून खाक झाली. यामध्ये सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे.
राजाराम मासये यांनी हर्डी सडा येथे १५० काजू कलमांची बाग केली आहे. हनुमान जयंतीदरम्यान या बागेला आग लागली. त्यामध्ये सुमारे १०० झाडे जळून खाक झाली आहेत. यामुळे त्यांना मिळणारे उत्पन्नही गेले असून, त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 19/Apr/2025














