रत्नागिरी : महाराष्ट्र ऊर्जा राज्यमंत्री मेघर्ना बोर्डीकर साकोरे यांच्या सुचनेनुसार वीज कंपनी प्रशासन व भारतीय मजदूर संघ अशी मीटिंग १६ एप्रिल रोजी एमएसइबी च्या मुंबई येथे मुख्यालयात झाली. विविध राज्यात शासनाच्या वीज कंपनीत वायरमन ट्रेडला पद भरतीमध्ये संधी मिळते ती महाराष्ट्रात मिळावी यासाठी तातडीने याबाबत योग्य व सकारात्मक निर्णय घेऊन वायरमन ट्रेडला तातडीने संधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी उर्जामंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे करण्यात आली.
अनेक वीज कंत्राटी कामगार यांना विविध पदांच्या भरतीमध्ये वयाच्या ४३ वर्षापर्यंत शिथिलता मिळून त्यांना पुन्हा फॉर्म्स भरण्याची संधी शासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली अन्यथा १ मे रोजी असलेल्या महाराष्ट्र दिना पासून महापारेषण कंपनीचे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील प्रकाशगंगा या मुख्यालया समोर संघटना व राज्यातील सर्व वायरमन उमेदवार व कार्यरत वीज कंत्राटी कामगार हे बेमुदत धरणे आंदोलन व आमरण उपोषण सुरू करतील, असा इशारा कामगार संघटनेने दिला असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष नीलेश खरात यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 19/Apr/2025














