संगमेश्वर : सरंद पुलावरील ‘त्या’ सदोष फलकामुळे वाहन चालकांची फसगत

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ ते सरंद सरंद ते आंबव पोंक्षे मार्गे आरवली असा १० किलोमीटर अंतराचा रस्ता नुकताच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्ण झाला आहे. आता या रस्त्यावर लावण्यात आले अनेक ठिकाणचे दिशादर्शक फरक सदोष असल्याने या रस्त्यावरून नव्याने ये जा करणाऱ्यांची चांगलीच फसगत होत आहे.

माखजन आरवली मुख्य मार्गावर सरंद पूल येथे उजवीकडे बाण दाखवत करजुवे असे दाखवण्यात आले आहे. वास्तविक पाहता उजवीकडे वळल्यास, वाहन थेट तुरळ कडे जात आहे. याठिकाणी हा बाण उजवीकडे न दाखवता खालच्या बाजूला दाखवणे अपेक्षित होते. परंतु चुकीच्या पद्धतीने दिशादर्शक फरक लावल्याने वाहनचालकांध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तसेच आंबव पोंक्षे गावात कोणतीही दिशा न दाखवता जुवळे वाडी असा फलक लावण्यात आला आहे. प्रत्यक्ष फलकापासून जुवळे वाडी सुमारे २ किलोमीटर अंतरावर आहे. शिवाय वाड्यांचे फलक देखील चुकीच्या ठिकाणी लावले असल्याचे चित्र आहे. फलक प्रत्यक्ष लावताना ग्रामपंचायतीची संपर्क साधून लावले गेले असते तर चुकीच्या ठिकाणी हे फलक लावले गेले नसते.

सरंद येथील चुकीच्या फलका बद्दल सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. सदोष असलेले दिशा दर्शक फलक तात्काळ बदलण्यात यावेत अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 21/Apr/2025