खेड तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे शनिवारी त्रैवार्षिक अधिवेशन

खेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडचे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत गणेश मंगल कार्यालय, भरणे, खेड येथे आयोजित करण्यात आले आहे. शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शरद भोसले या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय योगेशदादा रामदास कदम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत माजी आमदार संजयराव कदम, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती शशिकांत चव्हाण आणि माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम यांची देखील उपस्थिती असणार आहे.

याव्यतिरिक्त, खेडचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, खेडचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, शिक्षक समितीचे राज्य सल्लागार विजयकुमार पंडित, राज्य ऑडिटर अंकुश गोफणे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, जिल्हा नेते दिलीप महाडिक, जिल्हा सरचिटणीस संतोष पावणे, जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश जाधव, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे माजी चेअरमन सुनील सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संजय सुर्वे, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक सुनील दळवी, जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर या अधिवेशनाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस धर्मपाल तांबे, उपाध्यक्ष बबन साळवी, अनिल यादव, मुख्य संघटक संतोष यादव, संघटना प्रवक्ता नेत्रदीप तांबे, तालुका प्रसिद्धीप्रमुख शैलेश पराडकर, दिलीप यादव, डीसीपीएस प्रतिनिधी येडू केकान, संतोष बर्वे, नारायण शिरकर, बबन मोरे, संतोष चव्हाण, अनिल मोरे, अमर चव्हाण, नवनीत घडशी, तुकाराम काताळे, संतोष मोरे, दीपक कांबळे, भागोजी कडव आणि शिक्षक समितीचे सर्व सभासद बंधू-भगिनी अथक परिश्रम घेत आहेत.

या त्रैवार्षिक अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसिद्धी प्रमुख शैलेश पराडकर आणि दिलीप यादव यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 22/Apr/2025