नांदिवडे येथे गॅस टर्मिनलचे बंद काम पुन्हा सुरू करण्याचा घाट; आंदोलनकर्त्या ग्रामस्थांचा आरोप

गणपतीपुळे : नांदिवडे येथील गॅस टर्मिनल प्रकल्प स्थलांतर करावा, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी शेतकऱ्यांनी १४ एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. त्या नंतर आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जिंदल कंपनीने लेखी आश्वासन दिले होते. मात्र, तरीही कंपनी नांदिवडे येथे गॅस टर्मिनल पुन्हा उभारण्याचा घाट घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी केला आहे.


या बाबत २५ एप्रिलला निर्णय घेणारे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत शेतकऱ्यांची सभा होणार होती. तो पर्यंत कामकाज बंद राहील, असे आश्वासन देण्यात आले होते. दरम्यान, दि. २१ एप्रिल रोजी कंपनीने रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना लेखी निवेदन दिले आहे.

त्यानुसार आम्हाला काम थांबवणे अशक्य व अवघड होत आहे. तेव्हा आम्ही २२ एप्रिलपासून काम सुरू करत आहोत. आश्वासन देऊनही टर्मिनलचे काम सुरू केल्याचे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी कंपनीला लेखी आश्वासनाचे पत्र दाखवले. मात्र, तरीही कंपनी आपल्या मतावर ठाम राहिली आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी कंपनी दगाबाजी करीत असल्याचा आरोप केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 23/Apr/2025