खेड : शहरात ४३ कोटी रुपये खर्च करून नव्याने राबवण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नळपाणी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नव्या नळपाणी योजनेच्या खोदाईमुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
या कामांमुळे जुन्या जलवाहिन्या ठिकठिकाणी फुटत आहेत. परिणामी, नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुराव्याने नव्या नळपाणी योजनेसाठी ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
प्रत्यक्षात नव्या नळपाणी योजनेचे कामदेखील गेल्या चार महिन्यांपासून वेगाने सुरू झाले आहे. यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे; मात्र या याजनेच्या कामामुळे एका नव्या समस्येने डोके वर काढले आहे.
सद्यःस्थितीत नव्या पाणीयोजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्यांची खोदाई केली जात आहे. खोदाईनंतर मार्ग सुस्थितीत न आणता तसाच ठेवला जात असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याचा त्रास नागरिकांना होतो. या पाठोपाठ नवीन जलवाहिनीच्या खोदकामाचा जुन्या जलवाहिनीलाही फटका बसत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 23/Apr/2025














