राजापूर : तालुक्यात तळगाव, कोंडये, मोसम व अन्य परिसरात खैर चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. तळगावमध्ये एका शेतकऱ्याची आठ झाडे रातोरात कापून चोरून नेली आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी वन विभाग आणि पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
राजापूर तालुक्यात ग्रामीण भागात दरवर्षी या हंगामात खैरांच्या झाडाची चोरी होते. यावर्षी तळगाव व परिसरात खैर चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. काही दिवसांपूर्वी खैराच्या झाडांची चोरी केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा तळगावातील एका शेतकऱ्याच्या बागेतील खैराची झाडे तोडून नेली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खैरांच्या झाडांची तोड करून चोरी करणाऱ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 24/Apr/2025














