भाट्ये किनाऱ्यावर समुद्रात झेपावली १०६ कासव पिल्ले

रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजीक भाट्ये येथे पर्यटकांची संख्या वाढत असतानाच याठिकाणी राबवण्यात आलेल्या कासव घरटी संवर्धन मोहीमेअंतर्गत गुरुवारी १०६ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. वनविभाग कांदळवन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली भाट्ये येथे गतवर्षीपासून ही कासव घरटे संरक्षण मोहीम राबवण्यात येत आहे.

भाट्ये येथील कासवमित्र समीर भाटकर यांच्या माध्यमातून कासव संवर्धन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वनविभाग व कांदळवन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे. गतवर्षीही भाट्ये किनारी कासवांची घरटी सापडली होती, त्यांचे संवर्धन करण्यात आले होते. यावर्षीही झरीविनायक मंदिरानजीक कासव संधर्वन प्रकल्प राबवण्यात आला आहे.

कासवाच्या अंड्यांचे माणसांकडून किंवा कोल्हे, कुत्री यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी शासनाकडून संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली आहे.

चालू वर्षी यापूर्वी ३५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली होती. यावेळी १४४ अंड्यांमधून १०६ पिल्ले गुरुवारी सकाळी समुद्रात सोडण्यात आली. यावेळी सरपंच प्रिती भाटकर, माजी सरपंच पराग भाटकर, उपसरपंच राजेश पाटील, कासवमित्र समीर भाटकर व ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास ही पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.

यावेळी तपमानात मोठी वाढ झालेली असल्याने, त्याचा परिणामही कासव संवर्धन मोहीमेला जाणवत असल्याचे सांगण्यात आले. कासवमित्रांकडून सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 25/Apr/2025