रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा विभागातर्फे २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निर्दयतेने मारले गेलेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ही श्रद्धांजली तसेच निषेध निदर्शने रत्नागिरीतील जयस्तंभ चौकात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध केला. यावेळी अभाविप नगर मंत्री सई कान्हेरे, शहर सहमंत्री सुमित पाध्ये व योगेश कांबळे तसेच कार्यकर्ते आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 25-04-2025











