खेड : खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे नगर परिषदेच्या प्रशासक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. या पूर्वी खेडचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे प्रशासक पदाची जबाबदारी होती. प्रांताधिकारी यांच्याकडे कार्यभार होता तेव्हा नगर परिषदेची अनेक कामे खूप विलंबाने होत होती.
आता मुख्याधिकारी रोडगे यांच्याकडे प्रशासक पदाचा कार्यभार दिल्यामुळे नागरिकांची तसेच प्रशासकीय कामे जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. राज्य शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी तसे आदेश रोडगे यांना पत्रादरे दिले आहेत. खेडच्या नागरिकांनी या नियुक्तीचे स्वागत केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 29/Apr/2025














