रत्नागिरी : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, पूर्णगड नं. १ रत्नागिरी या शाळेच्या पदवीधर शिक्षिका व मुख्याध्यापिका भारती तायशेटे यांना गोवा गव्हर्मेंट पीडब्ल्यूडी स्टाफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड गोवा, इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी रजिस्टर बेळगावी, नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन रजिस्टर बेळगावी यांच्यामार्फत दिला जाणारा आदर्श शिक्षिका राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा गोवा येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातील उल्लेखनीय व चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचा व गावाचा मान वाढला आहे. शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या भारती तायशेटे यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
त्यांच्या या कार्यात मदत करणारे शिक्षक-पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांचे मोलाचे सहकार्य आहे. तसेच त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे पती विजय जाधव यांचाही मोलाचा वाटा आहे. श्रीमती तायशेटे यांच्या या यशाबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. कासार, उपशिक्षणाधिकारी श्रीमती शिरभाते, उपशिक्षणाधिकारी श्री. कडव, गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रा. एस. जे. मुरकुटे, पावस बीट शिक्षण विस्तार अधिकारी सायली सावंत (माजी), सशाली मोहिते, श्रीमती हिरवे, माजी केंद्रप्रमुख दीपक गुरव, उल्हास पाटील, केंद्रप्रमुख संजय राणे यांनी कौतुक केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती तायशेटे यांच्यावर शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह पूर्णगड ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती पूर्णगड नं.१, ग्रामस्थ, पालक, सर्व शिक्षक, विद्यार्थी, यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 29/Apr/2025














