रत्नागिरी : भूमी अभिलेख कोकण प्रदेश मुंबईचे उपसंचालक अनिल माने यांनी केली शासकीय कार्यालयांची पाहणी

रत्नागिरी : शासकीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा एकूण सात मुद्द्यांवर जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, उपअधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी या तीन कार्यालयांना भेट देऊन भूमी अभिलेख कोकण प्रदेश मुंबईचे उपसंचालक अनिल माने यांनी तपासणी व मूल्यांकन केले.

जिल्ह्यातील भूमापन नकाशाचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन इ-रेकॉर्ड बल्कसाईन, परीरक्षण भूमापक आणि लिपिक यांच्या दप्तरांची तपासणी उपसंचालक माने यांनी केली. तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील १०० दिवसांच्या कृती आराखडा कामाचा आढावा घेतला. केळ्ये येथील स.नं. १९० क्षेत्र ०.७८.८ गावठाणमध्ये स्वामित्व योजनेअंतर्गत ७६ मिळकती करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी काही मिळकतींची पाहणी माने यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 30/Apr/2025