जयगड- बोरिवली एसटी बस आजपासून सुरु

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील जयगड बोरीवली मुंबई एस.टी. बस महाराष्ट्र दिनाच्या १ मे २०२५ पासून नियमित सुरू करण्यात येणार असून प्रवाशांनी या एस.टी. बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन खंडाळा येथील बस स्थानकाचे वाहतूक निरीक्षक श्री. चव्हाण यांनी केले आहे.

ऐन प्रवाशांच्या हंगामात सुरू करण्यात येणार असल्याने जयगड, चाफेरी, खंडाळा, कळझोंडी, आगरनरळ, चाफे, जाकादेवी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 01/May/2025